“
काही पुस्तकं वाचायची राहून गेलेली,
काही फक्त bookshelf ची शान वाढवणारी.
काही मात्र सारखी वाचून काढलेली,
तर काही गूढ, न उकलणारी.
काही पुस्तकं अर्ध्यावरच सोडलेली,
तर काही दरवेळी वेगळा अर्थ सांगणारी.
..आणि काही असतात आठवणीतली,
हलकेच मनावर फुंकर घालणारी!
”