“
जीवन
जीवनात रम्य बालपणी खेळतो , बागडतो
तरुणपणात सुखदुःखाच्या उनसावल्या झेलत ,
अवघड घाट ओलांडतो
मध्यमवयात यशाची शिखरे पादाक्रांत करतो
प्रौढवयात नव्या वळणावर जरासा थबकतो
वृद्धावस्थेत पैलतीर दिसताच
नातेसंबंधात हळूवार होतो
ह्यालाच जीवन ऐसे नाव
सौ मनीषा
”