यातना लेखणीत माझ्या
यातना लेखणीत माझ्या
यातना लेखणीत माझ्या
मीच माझ्या मांडल्या
काटेरी वाटेवरती जखमा
भळभळत्या ह्या सांडल्या
यातना त्या भोगतांना
जीवास त्या दुखावल्या
यातना ह्या लेखणीत
मांडतांना सुखावल्या
शब्दांच्या आसऱ्याने
यातना ह्या कांडल्या
सुखाशी एकजीव त्या
व्यथेत मी मांडल्या
यातना शब्दांत या
गर्भितार्थ पावल्या
सुखाच्या झलकेच्या
दिसती मज सावल्या
यातना सोसत ह्या
शब्दबद्ध जाहल्या
मीच माझ्या यातना
मग हसतांना पाहिल्या