STORYMIRROR

Savita Kale

Tragedy

4  

Savita Kale

Tragedy

वसुंधरा

वसुंधरा

1 min
48

वसुंधरा मी तुम्हां सांगते

माझी जीवनकहाणी

हिरवा शालू माझा देखणा

दिसायची मी देखणी।। 


हिरवे शामल डोंगर सारे

स्वच्छ नदीचे झुळझुळ पाणी

किलबिलाट तो पक्ष्यांचा

मधूर, सुस्वर मंजुळ गाणी।। 


गरजा सा-या पुरवित होते

पण हाव मानवा लागली

चहूदिशांनी काया माझी

स्वार्थासाठी ओरबडली।। 


उजाड, भेसूर डोंगर झाले

दूषित झाले निर्मळ पाणी

वृक्षतोड ती भयाण केली

विरली मंजुळ पाखरगाणी।। 


काय असेल भविष्य माझे

विचार करते क्षणोक्षणी

प्रदूषणाने काळवंडली काया

आता राहिली न देखणी।। 


नष्ट होईल माझी काया

श्वास तुझाही गुदमरून जाईल

माझ्यावरचे आस्तित्व तुझे

तुझ्यामुळेच संपून जाईल।। 


माझ्या मनाची आर्त विनवणी

आता तरी समजून घे

पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे

वचन आज तू मला दे।। 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy