वसंत ऋतू
वसंत ऋतू
1 min
1.0K
असा तापतो उन्हाळा
फुटे नवीन पालवी
ऋतू वसंत येताच
रुप निसर्ग फुलवी ।।
वृक्ष वेली बहरता
गंध वारा दरवळे
तरु येता मोहरुन
देती अमृताची फळे ।।
लागे वसंत चाहूल
होती तरु पानगळ
धरा फलवीते काया
झटकून मरगळ ।।
ऋतू वसंत फुलता
येती नवे नवे पक्षी
फिरे थव्या थव्याणे
देती वसंत ची साक्षी ।।
आसमंत रे फुलला
दिसू लागे नवलाई
येता वसंत मोहर
सारी डोले वनराई ।।