वसंत ऋतु..!
वसंत ऋतु..!
वसंत ऋतू....!
वसंताची मजा आगळी
त्याची रया जगा वेगळी
त्याच्या सवे नाचती सगळी
तरीही आज प्रिया फुगली..
झाडा झाडा तून
कोकीळ गाते
क्षणा क्षणाला
लकेर उठते..
दवावर हसरे
मोती खुलती
चम चम करूनी
आभा फाकती..
घरची माय लेकरे
पाणवठ्यावर येती
वासरा पाहून
गाई हंबरती....
वासुदेवाची अभंग वाणी
गल्ली गल्लीतून साद देती
माया लेकरे
उंबरठ्यावर दान ठेवती..