Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

वसंत फुलला मनोमनी

वसंत फुलला मनोमनी

1 min
626


वसंत फुलला मनोमनी

बहरले अंग सुमनांनी

मन ही उल्हसित जाहले

मोहरले मन वसंतानी


फुटले अंकुर हर्षाचे

नवे कोंब आशेचे

पालवी हळूच डोलते

मनीचे गुज गाते


कसलासा गंध हा

मनाला भावतो पहा

मी होऊन सुकली पाती

ऊडून गेली वाऱ्यावरी


हिरव्या रंगाची मुक्तता

उधळली माझ्या मनी

मीही होऊन फुल ते

मधाळली सुवासिक


रंगबिरंगी रंगले मी

कळीचे फुल होऊनी

ताज्या उन्हांत न्हाले

छेडीतो वारा पाहून सारे


मीच पानगळ केली

सजले नव्या पालवीने

ऊजळून निघाले

नटले नव चैतन्याने


वसंत हा बहरला

मनाने श्रृंगार केला

हा ओसरू नये गारवा

सुखदायी स्पर्शांचा


मन डोलतयं

हळुवार बोलतंय

गीत गातंय वेडं

वसंतात फुललंय


आनंदून शहारला

हा बदलाव मनीचा

सुखावतो मनीचा

तरल हा पिसारा


मन असे जाहले धुंद

नयनी उतरले अंतरंग

मजला हवा हवासा

पुन्हा पुन्हा हा वसंत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational