Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

वरदान..

वरदान..

1 min
203


जगतो आहे मी जिणे, देवा फक्त तुझ्या कृपेने

  दिले दोन हात मला तू, करायला काम,

  खातो मी सुखाने रोज, गाळुनिया घाम.

हरामाचे नको, खाईन कष्टाचे मी चने....


   भल्या मार्गाने चालाया, तू दिले पाय मला,

   जाऊ कसा सांग मी देवा, बुऱ्या मार्गाला.

काटेकुटे, खाच खळगे, याला नाही भिणे....


   सत्यवचन बोलाया तू, वाचा मला दिली,

   तुझे नाम घेता माझी, जीभ गोड झाली,

गाऊ कशाला देवा मी, उगीच रडगाणे....


   दिले नेत्र मला तू, सर्वत्रच तुला पाहायला ,

   मात्यापित्याच्या रुपाने आलास घरी भेटायला,

आशिर्वाद त्यांचे असता, मला काय उणे....


   विचार करायला ही तू, बुद्धी मला दिली,

   बुद्धीच्या च बळावर ही प्रगती खूप केली

वरदानच तुझे मला सारे, विविध या रुपाने....


   स्वर्ग इथे निर्माण करण्याची तू शक्ती मज दिली

   हवे होते पुण्य खूप पण, पापच सारी झाली

माझ्यामुळेच मला इथे झाले कठीण जिणे

मागतो मी मरण देवा, नको हे वाईट जिणे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract