Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

वंशवेल

वंशवेल

1 min
217


आई-बाबा मलाही हे

 सुंदर जग बघू द्या..

आईच्या कुशीत पुरते

नऊ महिने जगू द्या..


       मीच इंदिरा- प्रतिभा अन

       अनाथांची माऊली सिंधुताई..

       मीच मनभावन शब्दांत

      जीवनकाव्य गाणारी बहिणाबाई..


"म्हातारपणाची काठी" असा

मुलगा तुझ्या वंशाचा दिवा..

वृद्धाश्रमाची वाट दावतो

तरी तो कशाला हवा..?


           अजूनही लक्षात घ्या

           मुलगी आहे " वंशवेल"..

           सासर- माहेर राबूनी

           सहन करी घालमेल..


आई, तू पण होतीस

अशीच आईच्या पोटात.. 

तेव्हा घातलं असेल

डोहाळे जेवण थाटात..


         आता माझ्यावर रुसून

         गमावू नकोस स्वत्व..

         लिंगचाचणी करून मिटवू

         नकोस माझं अस्तित्व..


पाच महिने सरले आता

चारच उरले आहेत..

माझ्या श्वासांचे जगणे

तुझ्या इच्छेवर तारले आहे..


Rate this content
Log in