वंदन विर लहुजीला...
वंदन विर लहुजीला...
वंदन वीर लहुजीला...
'
पुष्पाग्रज '
जगेन तर देशासाठी,
मरेन तर देशासाठी
असा जगी एकच
तो लहुजी गर्जला,
अन् कोटी कोटी वंदन
त्या वीर लहुजीला...
क्रांतीची तो मशाल,
इंग्रजांचा कर्दनकाळ
आखाड्यात उभी केली
स्वातंत्र्य चळवळ,
असा महान योध्दा,
नाही होणार नाही झाला...
घडविले क्रांतीकारक
देऊन पराक्रमाचे धडे,
नाव लहुजीचे ऐकून,
झोप इंग्रजांची उडे
टिळक, फुले, फडके गुरू कित्येकांचा झाला...
लई मर्दानी ताकद
होती हिंमत वाघाची,
सुवर्ण अक्षरात, इतिहासात
नोंद लहुजी पराक्रमाची
मायभूच्या रक्षणार्थ
चरणी प्राण अर्पीला...
त्या लहुजीचं रक्त
आहे आमच्या अंगात,
इमान, पराक्रम आहे
अजून ही मांगांत
बोलू ' जय लहुजी '
आहे अभिमान आम्हाला...
गायकवाड आर.जी.दापकेकर
९८३४२९८३१५
