वजनकाटा
वजनकाटा
1 min
172
गाली हसतो मिश्किल
दावी मजला वाकुल्या
नको लोटू मज दूर
गोष्टी सांगतो हिताच्या
सर्व धनात प्रमुख
आहे आरोग्य धन
जाण तू आधीपासून
मी कोप-यात पडून
वय कोवळे तरुण
सुख घ्या खानपानाचे
तरी असावा संयम
भान हवे मर्यादेचे
येई मग जरावस्था
पथ्य होईल कडक
मग होईल पस्तावा
व्हावे सावध तडक
रुसलीस मजवरी
तरी कर्तव्य जाणतो
जरी टाकी कोप-यात
मनी काटा तो हसतो