Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shobha Wagle

Romance Inspirational

3  

Shobha Wagle

Romance Inspirational

विवाह - मिलन

विवाह - मिलन

1 min
129


युवक युवती प्रेमात पडती

लग्नाचा प्रस्ताव मांडती

दोन कुटुंबें एकत्र येऊनी

बोलणी करुनी लग्न लावती.


विधी, मंगलाष्टके यथासार होई

देणे घेणे घराणी समजून घेई

सप्तपदीच्या वचनाने लेक क्षणात

पतीची अर्धागिनी होऊन जाई. 


विवाह सोहळा आप्ताचा मेळावा

पंगती मागून पंगती सारख्या बसती

उखाण्याची लज्जत एकसे एक बाई

गठबंधनची गाठ करवलीच सोडती.


विवाहाने लेक झाली सासूरवाशीण

गृहप्रवेश करी गृहलक्ष्मी माहेर सोडून

माप उलटून घरात शिरता क्षणीच

पत्नी होऊन पती संसारात जाई रमून.


आईवडिलांचे,आप्तजनांच्या शुभेच्छा

घेऊनी करी सुरुवात नव्या संसाराची

तिच्या हाती असे दोन घरांचा मिलाप

लेक झाली सुन सासरी नव्या घराची.


लग्न विवाह मिलन होई दोन जिवांचे

सप्तपदी वचने निभावयाची दोघांनी

एकमेकानी सांभाळावे एकमेकाला

दांपत्तिक जीवन जगावे एकमेकांनी.


Rate this content
Log in