Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Inspirational

4.0  

Jyoti gosavi

Inspirational

विठू माऊली तू माझी विठू माऊली

विठू माऊली तू माझी विठू माऊली

1 min
161


पांडुरंगा तुझा, लागला रे लळा

 भाव माझा भोळा ,तुझ्या नाना कळा

 भक्तीचा कळवळा, पाणी आले डोळा

 तुझ्या दर्शनाची ओढ आज लागली

 विठू माऊली तू माझी विठू माऊली 


राहिला तू उभा ,चंद्रभागेतीरी

 वसवली पंढरी, वैकुंठ नगरी

 येरझारा करी, भोळा वारकरी

 तुझ्या दर्शनाची आस आज लागली

 विठू माऊली तू माझी विठू माऊली


 दिंड्या पताकाची, झाली गर्दी भारी

 टाळ मृदुंगात, नाचे वारकरी

 तुझ्या दर्शनाला, लागे मोठी बारी 

तुझ्या दर्शनाची ओढ आज लागली

 विठू माऊली तू माझी विठू माऊली


 सावळे रूप ते ,पाहिले मी डोळा 

दाटला उमाळा, भरून आला गळा

कपाळी अभिर, कंठी तुळशीमाळा

 राऊळी चा कळस, न्याहाळी वेळोवेळा

 तुझी भक्ती आज भरुनी कशी पावली

  विठू माऊली तू माझी विठू माऊली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational