विसर्जन
विसर्जन




बघता बघता होते
सांगता उत्सवाची
वेळ येऊन उभी
राहते विसर्जनाची
डोळे येतात भरून
गौरीगणपतीला निरोप देतांना
पुढच्या वर्षी लवकर या
म्हणतो तुम्ही गावाला जातांना
चूका आमुच्या घे
सामावून तुझ्या पोटी
नाम तुझे सतत
राहू दे ओठी
झाले जरी विसर्जन
तरी राहू दे तुझी कृपादृष्टी
तुझ्या आशीर्वादाने अशीच
फुलत राहू दे सृष्टी