Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sarika Jinturkar

Classics Others

4  

Sarika Jinturkar

Classics Others

विश्वास

विश्वास

1 min
350


आई-वडिलांच्या प्रेमाचा 

स्पर्श असतो ज्यास 

सर्व नात्यातील ऋणानुबंध अलगदपणे जपल्या जातात 

बंध आयुष्याचे घट्ट विणले 

जातात ज्यामुळे खास 

तो आहे विश्वास  


 लहानापासून मोठ्यापर्यंत 

पाडतो भुरळ मनास

हळूवारपणे स्पर्श करतो जो 

प्रत्येकाच्या हृदयास 

तो आहे विश्वास 


संसारात ज्याच्या शिवाय

 सुख लाभत नाही कोणास 

अनोळखी व्यक्तीला आणतो 

जो आपल्या आसपास 

तो आहे विश्वास 


अतूट बंधन तयार होतात

 त्यामुळे जीवनास 

आयुष्याला उजाळा

 मिळतो येते उधाण 

आनंदास तो आहे विश्वास  


कमवायला वर्षे,

गमवायला सेकंदही लागत नाही

ज्याशिवाय जीवन वाटते भकास 

तो आहे विश्वास 


 सुरुवात होते ज्यामुळे प्रत्येक नात्यातील प्रेमास 

 सुख-दुःखात साथ मिळते आयुष्यभर लाभतो

ज्यामुळे आपल्या जिवलग व्यक्तींचा सहवास तो असतो विश्वास..


Rate this content
Log in