विश्रांती
विश्रांती
विश्रांती म्हणजे पहुडणे
हे माझ्या तत्वात बसत नाही
दुपारच्या जेवणा नंतर
आडवे होणे मला पटत नाही...
शून्यात नजर प्रसन्नतेने स्थिराऊनी
मी माझी विश्रांती घेतो
हाती असले जरी विरंगुळ्याचे साधन
तरी मी ते थोडे दूर सारतो..
आवडते मला शून्यात रममाण होणे
नसते मला काही दुसऱ्याशी देणे घेणे...
अनॉनयमाऊसने हे नजरेने हेरले
आणि कॅनव्हासवरी लीलया पेरले
शांत धीर गंभीर प्रसन्न मुद्रा रेखुन
एक सुंदर बोलके चित्र माझे साकारले...