Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kalpana Nimbokar

Others

3  

Kalpana Nimbokar

Others

वेदना

वेदना

1 min
372


प्रत्येक भावनेला आज 

हिणवुन लोक जातात

आरसा मनाचा हा 

फोडून लोक जातात


नाहीत करीत कदर

भावनेच्या फुलांची

ताज्या भावनांनाही

तुडवुन लोक जातात


तुकडे मनाचे या

मोजता ना आले

शब्दानीच शब्दाचा 

झेल घेवून लोक जातात


व्यर्थ करितो चिंता

आम्ही आमुच्या भविष्याची

दुसर्‍याच्या प्रतिमेला का?

डागाळुन लोक जातात


मी ना थांबले कधी

धरता कास प्रयत्नाची

दूसर्‍याच्या पाहून यशाला

नाक मूरडुन लोक जातात


मी ना केला कधी 

पुकारा मम दुःखाचा

माझ्याच वेदनेला का?

चिरडून लोक जातात


Rate this content
Log in