Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

वेदना तिच्या पायाची

वेदना तिच्या पायाची

1 min
198


नाजूकसाजूक पाय तिचे

भाग्य काट्याचे उजळले

रूतुन पायात तिच्या

अन् काळीज तळमळले


 नशिबी काय म्हणावे

त्या वाटेचे की

तिने चालतच यावे

येताना पाहुन तिला

काट्यांनी धावत यावे


विव्हळते नाजुकशी ती

अन् अश्र गालावर ओघळती

काट्याने काटा काढून

वाट लाल होती


टोचावे तरी कितीदा काट्यांनी पायांना तिच्या

आणि घाव तरी किती द्यावे

अडवून वाट तिची 

का तिला रडवावे


अरे येणेजाणे तिचे 

त्या वाटेवरूनच

तरी उगाच छळून का जखम द्यावी

रक्ताळलेल्या पायांना तिच्या

एकदातरी हळवी फुकंर घालून द्यावी


जरा समजून घ्यावी काट्यांनी

वेदना तिच्या पायांची

टाकून द्यावा कधीतरी

सडा फुलांचा

एकच वाट तिला येण्याची


करून द्यावी वाट मोकळी

आणि दुरुन तिला पहात रहावे 

नकळत टोचेल जो काटा पायात तिच्या

मग त्याला भाग्यवंतच म्हणावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational