वेदना स्त्री मनाची
वेदना स्त्री मनाची
आठ मार्च जागतिक
दिन खास महिलाचा
बाकी तिनशे चौसष्ट
नित्य जांच सोसण्याचा.
सदा हसत मुखाने
करी स्वागत सर्वांचे
जपे आवडी निवडी
घरातल्या सकलांचे.
भोग वस्तू समजती
पुर्वी आता सदाकाळ
नाही कुणाला कळत
तिच्या अंतरीचा जाळ.
स्त्रीच्या मनाची वेदना
कधी कुणाला कळेना
स्वतः अंतरी कुढते
मन कुणी ओळखेना.
समभाव समानता
कधी तिला तो मिळेना.
पुरुषांच्या स्वभावाला
भाव स्त्रियांचा चालेना.