वेडावले मन
वेडावले मन
आज वेडावले मन
तुझ्या स्मृतीने
आई
प्रेम,
माया, वात्सल्य
तूच खरे धन......!!
कुठे शोधू तुजला
कुठं गेलीस
विरह
त्याग
आई तुझा
सोसवेना गे मजला...!!
कशी गेलीस अचानक
वेडावले मन
निरव
शांतता
नाही करमत
दुःख अपार भयानक....!!
खंत मनास वाटते
हवी होती
जननी
माय
दातृत्वाची खाण
अश्रू नयनी दाटते....!!
भाग्य थोर माझे
लाभली मज
कुस
प्रेम
अपार माया
अगणित उपकार तुझे....!!
नित्य अश्रू चोरते
आठवते तुझी
ममता
माया
श्वासागणिक माझ्या
नांव तुझे कोरते........!!
करा मायबाप सेवा
तुमचे हरेल
दुःख
भरभराट
होईल सदा
मिळेल त्यास मेवा....!!