Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract Tragedy

4.0  

Neha Ranalkar

Abstract Tragedy

वाईनने भरेल माप सांगा कोणाचे पाप

वाईनने भरेल माप सांगा कोणाचे पाप

1 min
225


किराणा दुकानावर मिळेल वाईन,

मुख्यमंत्र्यांचा निर्णय फाईन....!


वाईनने भरेल माप,

सांगा कोणाचे पाप |

सरकारी निर्णय झालाय

स्त्रीयांच्या डोक्यास ताप | |१| |


किराणा दुकानावर 

मिळेल वाईन | 

मुख्यमंत्र्यांचा का 

निर्णय फाईन | |२| |


देशाचं वाटोळं निघाले

आहेत हे करायला |

पुढेच दारुड्या लोकांच्या 

संसाराची राख भरायला | |३| |


सरकारी तिजो-या भरण्याची

लढविली आहे नवी शक्कल |

देशहितासाठी चांगले करण्याची

कधीतरी यावी ना अक्कल?| |४| |


अंगावर आले की घेतात हे

कुणालाही शिंगावर क्षणात |

नेस्तनाबूत करण्यास राजकीय

शत्रू असतात सज्ज रणांत | |५| |


सामान्य जनतेच्या हिताशी

यांना नसतेच मुळीच देणेघेणे |

निवडणूक जिंकण्यास टाकतात

आमिष रुपी चार चणे फुटाणे | |६| |


ह्यांच्या गलिच्छ राजकारणात

देशहितच जाते बाजूला पडून |

उपाय नाही कुठलाच येत करता

हतबल होतेय जनताच रडून | |७| |


सरकारी निर्णय किराणा दुकानात मिळेल वाईन ऐकून झालेल्या सुन्न मनाने केलेले विचार ह्या कवितेतून व्यक्त केले आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract