Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Others

4.0  

Vimal Patkari

Others

उपकार पर्जन्याचे

उपकार पर्जन्याचे

1 min
279


गरजत बरसत आला आला राजा पर्जन्या

गती मृगाची घेऊनी मेघ गर्जना करुनी

सोसाट्याच्या मरूत वाहनी स्वार होउनी!!


पर्जन्याच्या आगमनान आज बाई 

चिंब भिजुनी न्हायली धरणीआई

ग्रीष्मानं होणारी अंगाची लाही लाही 

गारवा देवून शांत केली जलधारांनी

कृष्ण धवल मेघातूनी जलनृत्य करीत 

भूमीच्या लेकरा मनी समाधानी कराया !!


शेतामधली काळ्या मातीची ढेकळी 

पावसानं भिजुनी झालीत हो मोकळी 

वसुंधरेपोटी आला ओलावा बाई

पेरणीसाठी शेतकरी शेता जाई

शेतकरी राजा हर्षून पेरणी करील

जनतेच्या पोटासाठी धनधान्य पिकवाया !!


कडक उन्हानं आटलेली निर्झर,नाली

रिमझिम रिमझिम पावसानं खळखळ वाहती

जलाविना तृषार्त झालेली सरिता ही

वर्षाच्या साथीनं दुथडी भरूनी वाही

सागर सरितांच्या मग होती भेटिगाठी

गोडमधूर नाती अन भेटी घडवण्या !!


जलबिंदू स्वातीचे शिंपल्यात मोती होती 

मृगजल धनधान्य पिकवी धरणीपोटी

पर्जन्याचे गाणे भूमीच्या ओठी

तृण हरित डोले पहा गुरांसाठी 

सृष्टीतील हा सारा मनोहर आनंद लुटाया 

पठारावरी नेती गुराखी गाई वासरे चाराया !!


Rate this content
Log in