उन्हातला पाऊस
उन्हातला पाऊस
वैशाख मास सरला, तसा आषाढही सरला।
रणरणत्या उन्हाने सारा, आसमंत थिजला।।
रोज अंबारी फिरताना, मेघास मी पहातो।
बरसेल वाटतो पण, डोळा चकवून जातो।।
वाट पाहुनी पावसाची, शेतमळा सुकून गेला।
डोळ्यात आणून पाणी, चातक ही निघून गेला।।
गळीत झाली गात्रे, मन थकून गेले।
ना थेंब पावसाचा, पण डोळे अजून ओले।।
घामाने डबडबलेला, उन्हात चिंब ओला।
तरी घेऊन येईल वाटतो, वारा पावसाला।।
कधी उन्हात पावसाची, हळुवार सर येते।
कोरड्या मनाला, कशी भिजवून चिंब जाते।।
मग मनात वाटते गं, मज करील चिंब ओला।
अन थेंबात आसवांनी, हसवील या धरेला।।