उनाड वारा
उनाड वारा
उनाड़ वारा वाहु तो लागला,
आठवणींचा सांगावा,
देऊ तो लागला,
जणू माझ्याचसाठी त्याला कोणी धाडीला
कोवळा स्पर्श माझ्या सख्याचा,
सांगू तो लागला उनाड वारा,
कसा छळतो मला,
त्या स्पर्शाचा ओलावा
बेभान गारवा,
अंगावरती शहारा,
फुलु लागला,
आठवणींचा झरा
मंद सुगंध, त्या क्षणांचा
दरवळ जसा, गुलाबी स्वप्नांचा
ओथंडुन वाहणाऱ्या,
तेजस्वी भावनांचा
प्रवास संपला,
वार्यासवे उनाड, माझ्या मनाचा
मुठीत साठवलेल्या,
धुंद क्षणांचा
परतुनी पुन्हा येशील केव्हा,
विचारण्या आधीच,
निघुनी तो गेला,
उनाड वारा