तू माझी होशील का
तू माझी होशील का


तुझ्या नशिली डोळ्यात मला सामावून घेतील का
एकदा का होईना तू मला आपलं करून घेशील का!!
एक क्षण तुझ्या जीवनाच्या मला तू देशील का
त्या क्षणी तू माझ्या प्रेमा मध्ये रमशील का !!
माझ्या भावनांना तू समजून घेशील का
एकदा सांग प्रिये तू माझी राणी होशील का !!
अनवाणी पायाने मी तु माझ्या जवळ येशील का
तापलेल्या श्वासांना माझ्या तू मंद करशील का!!
गोरा गोरा अंग तुझा उन्हात तू निघशील का
माझ्यासाठी रानात तू पाय वाटे येशील का !!
गंध धुंद झाडांच्या फुलासारखी फुलशील का
झाडाखाली थांबतो मी तू वाऱ्यासंगे येशील का !!
देवाशी माझ्यासाठी तू एकच प्रार्थना करशील का
खरं खरं सांग तू प्रत्यक्षात माझी होशील का!!