Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

तुझं ते हळूवार हसण

तुझं ते हळूवार हसण

1 min
145


काय असेल 

तुझ्या सौंदर्याच रहस्य

हे तुलाच माहित

पण तुला बघण्यासाठी

पहाट तुझी वाट बघतं असते 

तुला पाहील्याशिवाय

ती येत नसते


तुला पाहील्यावर 

वाराही तुझ्या अंगाभोवती

पिंगा घालत असतो

तुला मिठी मारल्याशिवाय 

जात नसतो


तुझं नटण मुरडणं पाहून

कळ्याही लाडावतात

तुझ्या कवेत येण्यासाठी

हळव्या होतात

तुला पाहील्याशिवाय 

त्या उमलत नाही

आणि तुझ्या स्पर्शा झाल्याशिवाय 

त्या फुलतं नाही


गजराही तुझ्या आठवणीत असतो

इथेतिथे शोधत तुला असतो

त्याला तुझ्या वेणीवर यायच असतं

 तुझ्या सोनेरी केसात 

शिरायचं असतं

 वाऱ्याची झुळुक

तुला छेडत असते

बट केसांची मागे घेताना

तू आणखीनच सुदंर दिसते


तुझं ते हळूवार हसणं

आणि गालावर लाजणारी 

नाजूक खळी

 नजरेला खूणवतं असते

तुला पाहून जणूकाही

सप्तरंगाची उधळण होत असते


काळोखातल्या चांदण्याही

तुझी वाट पहात असतात

तू एकदा दिसावीस म्हणून

काजवेही तुला शोधत असतात


सारा आसमंत तुझ्यासाठी

वेडा होताना दिसतो

तुझ्या सौदर्याच रहस्य 

शोधत असतो.

तू नजरेआड होवू नये

अस आरशालाही वाटतं असते

आणि आरसा पाहून

तू खूदकन हसतं असते


Rate this content
Log in