तुझी आठवण
तुझी आठवण




तू प्रत्येक वेळी वेळेवर येतेस, मीच थोडा लवकर येतो
माझ्यासाठी माझाच वेळ, काहीही न सांगताच जातो
जातो तो असा कधी कळतही नाही, जाताना काहीसुद्धा बोलत नाही
अबोला असतो एकांत उभा शांत, बोललो जरी काही साधं ऐकतसुद्धा नाही
तू आणि तुझी आठवण, वेगळे आहात की एकच आहात समजत नाही
समजलो जरी थोडं फार काही, त्यापेक्षा जास्त काही उमजत नाही
नाही मी नाराज नाही रागावलो, की चिडलोही नाही
जिथं तुझं लक्ष लागत नसेल, तिथं मी काय नवीन पाही