Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Aniket Kirtiwar

Others

3  

Aniket Kirtiwar

Others

तु उगाच बोंबलु नगंस

तु उगाच बोंबलु नगंस

1 min
1.3K


तु उगाच बोंबलु नगंस

आरं नेता खूप काही करता,

तु उगाच...


घोटाळा करतात, हवाला करतात

त्यांच कपडं दिसतं पांढरं

पण धंदा मात्र काळा करतात, तु उगाच...


आधी बायकासंग लफडं करतात

मग कोणत्या तरी खात्यावर सभापती करतात, तु उगाच....


जाती जाती मध्ये दंगली करवतात

आणि मग परिस्थिती आटोक्यात नाही

म्हणून गरिबावर गोळीबार करतात, तु उगाच...


आगोदर दारू बंदीसाठी कायदे करतात

मग देशाची आर्थिक स्थिती बिघडली की सर्वांना दारू प्यायचे परवाने देतात, तु उगाच....


पाय तुटला तर दहा हजार देतात

हात तुटला तर विस हजार देतात

मुडदा पडला तर एक लाख देतात

असाच मेला तर शोकसंदेश देतात

तु उगाच...


तवाचतं लोक एस. टीतं मरतात, इमानात मरतात जमतंच नसेल तर सरकारी गाडीखाली चिरडून मरतात

म्हणून तर म्हणतो नेता खूप काही करतात, तु उगाच.....


Rate this content
Log in