Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandrakant Dhangawhal

Others

3  

Chandrakant Dhangawhal

Others

तु फक्त.खचू नकोस

तु फक्त.खचू नकोस

1 min
274


तू किती हिंमतीने उभी रहातेस

काम करण्याचाच हट्ट करतेस

आलीत किती संकटे

तरी थांबू नकोस

 फक्त तू खचू नकोस


तू मला नेहमीच बळ देतेस

कितीही कष्ट आले तरी

मी आहे ना म्हणतेस

खुप दमून जातेस तेव्हा

मी तुझ्या पाठीशी असतो

तुझ्या आधाराचा हात मीच घेत असतो

मेहनत तुझी खुप आहे

तरी सोडू नकोस

फक्त तू खचू नकोस


प्रगतीची वाट धरून 

तू चालत रहा

ध्येयसिद्धीचे स्वप्न पहात रहा

रूपेरी कला तुझी आहे

आहे किती गुणांनी सजलेली

जणू आनंद छंदात बहरलेली

काही झाल तरी जबाबदारी तुझी सोडू नकोस

फक्त तू खचू नकोस


असेल किती स्वप्न तुझे

तू जमा करून ठेवशील

सारेच संकल्प तुझे साकर होतील

तुझ्या प्रगतीला दैवी आधार आहे

एक दिवस तू आभाळ कवेत घेणार आहे

चालत रहा तू मागू वळून पाहू नकोस

फक्त तू खचू नकोस


तुला मरेपर्यंत माजी तुला साथ असणार आहे

तुझ्या श्वासातून माझा श्वास  घेणार आहे

जाता जाता तुझे स्वप्न

 मी पुर्ण पुर्ण करून जाईन

आभाळातून

तुझ्या प्रगतीची भरारी पहात राहीन


Rate this content
Log in