'तु'ला
'तु'ला
शिक्षणा अभावी
मी नाही करू
शकलो काही
जीवनातल्या हौशी-मौजी...
तुझे शिक्षण चांगले व्हावे
पैशा अभावी काही न अडावे
हा एकच ध्यास माझ्या
मन बापड्याला...
'इंटरनॅशल स्कुल' मधे तुला घातले
चांगले शिक्षण मिळवण्यास
एक एक पैसा
वाटेल ते कष्ट करून...
शिक्षणाच्या या तुलेत
एका पारड्यात 'तु' ला बसवले
व मेळ माझ्या कष्ट करून
आणलेल्या पैश्याचा करत बसलो दुसर्या पारड्यात...
तुझे अभ्यास करतानांचे
चित्र डोळ्यासमोर ठेऊन
कष्ट माझे चालु ठेवले
तुझा शिक्षणाचा भार पैलत...
कितीही कष्टकरून
पैसा मी ओतला
तरी तुझ्या शिक्षणाच्या
खर्चाचे पारडे सतत जड...
डोळ्यात भरून
साठवत होतो तुझे
अभ्यास करतानाचे चित्र
'तु'झे लक्ष होते का माझ्या कष्टाच्या पैशा कडे?
तुलेत 'तु'ला तोलतांना
विसरून जात होतो सर्वकाही
तुझी वेळ आल्यास
तु करशील का माझी तुला अशीच?