टिपरी रास
टिपरी रास
सख्यांच्या मेळाव्यात बाई रंगली गं टीपऱ्यांची रास ,
वनितांच्या या आनंद लहरींत मला होई राधा-रुक्मिणीचा भास !
नानारंगी वस्त्रांनी खुलले बाई आम्हां सख्यांचे हो रूप,
धरिता तालवाद्यांचा ठेका रास रचण्यास चढे आम्हां हुरूप !
रिंगण करुनी साऱ्या मैत्रीणी रासलीलेत जाहल्या दंग,
रात्र चढत जाई तैसे टीपऱ्यांच्या रासलीलेत भरले जाती रंग !