Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kshitija Pimpale

Inspirational

3  

Kshitija Pimpale

Inspirational

त्सुनामी (मुक्तछंद)

त्सुनामी (मुक्तछंद)

1 min
521


उद्याच्या भविष्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन

निजले होते कित्येक जीव

जराही चाहूल नव्हती

कुणालाच येणा-या घटकेची

गोडगुलाबी स्वप्नात दंग होऊन

निद्राराणीच्या कुशीत विसावले सारेजण...


दिवसभ-याचा शिण घालवण्यासाठी

घर हेच असते प्रत्येकाचे हक्काचे ठिकाण

पण रात्र झाली वैरीण,

सारेच होत्याचे नव्हते झाले.....

धरणीकंप,प्रलय,त्सुनामी नावे जरी वेगळी


हाहाकार माजला सर्वत्र

उसळत्या लाटांच्या लहरीत

उध्वस्त झाले संसार

हजारो बेघर झालीत

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोलमडली

घरे माणसांची

मृत्यूच्या दाढेत गेले कित्येकजण

काही कळण्याच्या आत सारे घडले

काही कळण्याच्या आत सारे घडले ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational