तरीही
तरीही
वादळा तू थांबला नाही तरीही
दीप वाऱ्यात विझला नाही तरीही
ऐरणीच्या मस्तकावर घाव झाले
देह थोडा भंगला नाही तरीही
जिंकला तू डाव खोट्या भावनांचा
खेळ माझा संपला नाही तरीही
जाळले बागेस माझ्या सज्जनांनी
मोगरा बघ पेटला नाही तरीही
चांगले सत्कार केलेे वेदनांनी
कंठ माझा दाटला नाही तरीही