Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Others

4  

BABAJI HULE

Others

“ तरी तू आहेस आमच्या सोबतीला------

“ तरी तू आहेस आमच्या सोबतीला------

1 min
246


किरकिरणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजानं 

अगणित विचारांच काहूर साचलं होत मनांत.

थंडगार हलकासा वारा झोबंला अंगाला 

तरी तू होतास माझ्याबरोबर सोबतीला -----


अंधाराच्या पलीकडे त्राणच उरले नव्हतं पायात 

भितीची पाल मात्र शुकशुकत होती मनांत.

एकांतात अभ्यास व्हावा म्हणून वैरणीचा खोपा केला 

कारण तू होतास माझ्याबरोबर सोबतीला -----


रॉकेलचे तेल आणि कापडाची वात

चंबूसारखी दिसणारी ती पातळ काच.

हाताच्या हेलकाव्याने पुढेंमागे होणाऱ्या सावलीच्या मदतीला 

तरी तू होतास माझ्याबरोबर सोबतीला -----


रात्रनरात्र तुझ्याबरोबर बसायचो 

मिणमिणत्या वातीला वरखाली करायचो.

तुझ्याच कमीजास्त प्रकाशात अभ्यास माझा झाला 

कारण तू होतास माझ्याबरोबर सोबतीला -----


आठवणींच्या हिंदोळ्यांवर तू विसरलास आम्हाला 

की विजेरीच्या वाढत्या प्रभावानं आम्ही दूर केलं तुला,

याचा थांगपत्ता नाही लागला मनाला 

कारण तू अजूनही आहेस आमच्या सोबतीला -----


नाईट लॅम्प म्हणून तू स्वतःच नामकरण केलंस 

सौर ऊर्जेचे तर कधी विजेरीच्या साहाय्य घेतलंस.

पुन्हां पुन्हां हॉटलेच्या भितींवर दिसू तूलागला 

तरी तू आहेस आमच्या सोबतीला -----


स्वरूप बदलेले परंतु कामगिरी सारखीच 

गरजेची जागा आता मौजमजेने घेतलीच.

शो पिसच्या नावाखाली स्व:कार्यातून सेवानिवृत्त झाला 

तरी तू आजही आहेस आमच्या सोबतीला -----


Rate this content
Log in