तर मलाही आवडेल
तर मलाही आवडेल
1 min
261
कोणी अश्रू पुसणार असेल
तर मला रडायलाही आवडेल।
कोणी जवळ घेणार असेल
तर मला कुशीत जायलाही आवडेल।
कोणी समजवणार असेल
तर मला रुसायलाही आवडेल।
कोणी सोबत करणार असेल
तर मला फिरायलाही आवडेल।
कोणी पावसात येणार असेल
तर मला भिजायलाही आवडेल।
कोणी गोड चुंबन घेणार असेल
तर मला दाद द्यायलाही आवडेल।
कोणी जीव लावणार असेल
तर मला जीव द्यायलाही आवडेल।