Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

तोल...

तोल...

1 min
359


लहानपणी तोल जायचा तेव्हा

आईच मला आधार द्यायची

हातातले काम टाकून

माझ्याकडे धावत यायची..।।

शिशुवस्थेत मी बाबांचे

बोट धरुन चालायचे

कधी मध्येच पायही ठेचायचे

तरीही तोंडात आईच शब्द आठवायचे..।।

आजी आजोबा खूप जीव लावायचे

काका काकुही जवळ घ्यायचे

पण काहीही झाले तरी

आईच्याच हातचे जेवायचे..।।

आता बाळ मोठा झाला

वेगळया विश्वात रमून गेला

वेळीच तोल सांभाळणाऱ्या

आई बाबांनाही विसरला..।।

आता वेळ आली आहे

वृद्धत्वामुळे त्यांचा तोल जाण्याची

त्यांना बोटाने आधार देण्याची 

अन् प्रेमळ जपणाऱ्या मनाची...।।

वृद्धाश्रमातून त्यांना परत 

मायेच्या कुशीत आणण्याची

अन् त्यांच्या वृद्धत्वाचा 

 तोल सांभाळण्याची...।।


Rate this content
Log in