Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

तोड आता चौकटी

तोड आता चौकटी

1 min
198


जन्मच तुझा बयो , चौकटीतला

 पारंपारिक बायकी तत्वांतला

ज्योतिबा सावित्रींचा शिक्षण वसा

चौकट मोडूनच शिकल्या सख्या


शिक्षण , नोकरीने स्थान वरचे

तरी चिन्ह नव्हतेच समतेचे

चौकट मोडून समानता येई

ग्रामीण भागात चित्र भिन्नतेचे


मुलाच्या वाट्याला शाळा नि अभ्यास

मुलीच्या माथी कामाचा वनवास

चौकट मोडून केला अट्टाहास

शिक्षणाचा घेतला मुलींनी ध्यास


जुन्या चौकटी मोडल्या तरीसुद्धा

अट्टाहास कशासाठी करतेस?

नवीन चौकटी घालतो समाज

तू व्यर्थ कशासाठी स्विकारतेस?


चौकटी सगळ्या मोडून शक्तीने

दाखव बयो तुझे सामर्थ्य न्यारे

नकोत मजला बंधने चौकटी

कर्तृत्वाने जग जिंकेन मी सारे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract