तो कवडसा
तो कवडसा
1 min
237
तो कवडसा
आरशावर पडला तर
परावर्तित होतो
गालावर पडला तर
रंगाला येतो
छपरातून आला तर
घर ओलेचिंब करतो
कधी चांदण्या रात्रीत
चोरून प्रणय बघतो
तो कवडसा
अंधार कोठडीत
देवदूत होऊन येतो
लहान बाळासाठी
आरशातले खेळणे बनतो
दाखवतो अदृश्य
धूलिकण हवेतले
आणि लाल लाल रक्त
आपल्या तळव्यातले
आता कवडसा, येणार कसा
झिरपणार तरी कोठून
पत्र्यातून, प्लास्टिक मधून,
की सिमेंट काँक्रेट
च्या जंगलातून
गेले ते क्षण आता
गेलंय सार गोठून