Kirti Borkar

Tragedy


3  

Kirti Borkar

Tragedy


तिरस्कार

तिरस्कार

1 min 349 1 min 349

आई असता मिळे सारे ते प्रेम मला

गेल्यावर आली माझ्या अंगावर बला


लहान आहे म्हणून घरात आणली आई

विसरून दुःख सारे समजलो ती पुण्याई


तिच्या मुलींचा करते पूर्ण लाड बाई

मला अधिकार तरी दे म्हणायचा आई


चटके लागतात तेव्हा चालविते पायी

उचलून मला का कडेवर घेत न्हायी


का खरेच असा प्रेमातही भेद असतो

माणुसकीच्या नात्यालाही छेद असतो


काय केलं असं आता भोगू मीच पाप

माझ्याच जीवनी हा तिरस्काराचा हात?


Rate this content
Log in

More marathi poem from Kirti Borkar

Similar marathi poem from Tragedy