Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nandini Menjoge

Others

3  

Nandini Menjoge

Others

ती कुठेतरी हरवलीय..

ती कुठेतरी हरवलीय..

1 min
238


ती कुठेतरी हरवलीय.. 

मुलांच्या हट्टासाठी कायमच राबलीय... 

पतीच्या स्मितासाठी सदैव ती नमलीय.. 

पण ती कुठेतरी हरवलीय.. !!


दर रुपयांच्या हिशोबाला बचतीला नित्य जागलीय... 

ऑफिसाचा तान झेलून घराची अर्थ बाजू राखलीय.. 

पण ती कुठेतरी हरवलीय.. !!


घराच्या सुख समृद्धी साठी ती कायमच झटलीय... 

प्रत्येक आव्हाहनांना धीरानं पुढे गेलीय.. 

पण ती कुठेतरी हरवलीय.. !!


मुलगी, पत्नी, आई, सून प्रत्येक नातं ती जगलीय... 

तिच्या समृद्ध सहवासाने, नातेही पवित्रतेने नाहलेय..

पण ह्या सगळ्यात ती कुठेतरी हरवलीय.. !!


Rate this content
Log in