Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

M.B. More

Others

2.7  

M.B. More

Others

तिचा छंद

तिचा छंद

1 min
11.9K


तिचा छंद पणती होण्याचा

तर मला वात व्हायला आवडे,

तिला छंद चंद्र प्रकाशात नाहण्याचा

तर मला रात व्हायला आवडे ...१...


तिला छंद डोळ्यातील अश्रू पाहण्याचा

तर मला रडू व्हायला आवडे,

तिला छंद काळ्या फळ्यावर लिहिण्याचा

तर मला खडू व्हायला आवडे ...२...


तिला छंद गुलकंद जमा करण्याचा

तर मला फुल व्हायला आवडे,

तिला छंद आई होण्याचा

तर मला मुल व्हायला आवडे ...३...


तिला छंद गिरक्या घेण्याचा

तर मला भवरा व्हायला आवडे,

तिला छंद प्रियकर जमवण्याचा

तर मला नवरा व्हायला आवडे ...४...


असे छंद तिचे खूप सारे अनेक

तिला छंदच! अहो छंद पोसण्याचा,

प्रेम जिव्हारी लागलं तीच आता

मला छंद तिचा त्रास सोसण्याचा ...५...


Rate this content
Log in

More marathi poem from M.B. More