Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Angulimaal Urade

Romance

2.4  

Angulimaal Urade

Romance

ति.......!

ति.......!

1 min
335


विसरणार नाही रे, मी तीला कदापी

ती तर मला, वारंवार स्मरत असते.....!


कधीही नजरेआड, करणार नाही मी तिला

ती नेहमीच मला, वास्तवात शोधत असते.....!


आदर करणारे मी, तिच्या भावनांचा आता

कारण मी तिला, नेहमीच रडवत असते.....!


ती नेहमी माझेच, स्वप्न रंगवीत बसलेली असते

कारण तिच्या डोळ्यात, माझेच "प्रतिबिंब" असते.....!


वाट बघणार नाही मी, तिचा हात सोडून जाण्याची

कारण ती प्रेयसी आहे रे, माझ्या जीवा भावाची.....!


स्वप्न सोनेरी, माझे उराशी बाळगूनी

माझीच वाट बघत, ती सदैव बसलेली असते.....!


पण कधीच तिच्यापासून, दूर जाणार नाही मी

कारण ती फक्त माझ्यासाठीच, जीवन जगत असते.....!


ती माझ्यावर नेहमी रागावत असली तरीही

माझ्याच आठवणीमध्ये, ती गुरफटलेली असते......!


माझ्या "मार्शल" आठवणींची चाहूल लागता

माझी ती जीवन "प्रणाली", अश्रू गाळीत बसते......!



Rate this content
Log in