थोडीशी गंमत
थोडीशी गंमत
पार्टीचा आखला बेत
नका करू कुणी लेट,
नाहीतर बघा बाई,
येईल समोर रिकामी प्लेट.
करा जरा घाई बाई,
लवकर लवकर या,
वेगवेगळ्या मेनूची,
लिस्ट तरी पाहू या.
द्या रिप्लाय पटापट,
आवरा बघू चटाचट,
छान छान तयार व्हा,
नवे ड्रेस घाला फटाफट.
पाणीपुरी,शेवपुरी,रगडा
करूया साऱ्यांनी मजा,
आईस्क्रीम तर हवंच सोबत
नंतर घेऊ साऱ्यांनी रजा.