स्वप्न
स्वप्न
कला माझी ही अद्भुत
लावी साऱ्यांनाच लळा
तिच्या सेवेसाठी सारे
होती आनंदाने गोळा||१||
माझ्या कलेचे कौतुक
गावे किती मी गोडवे
हाती येताच लेखणी
रचा आनंदी कडवे||२||
छंद लागला जीवाला
मना समाधान मिळे
ज्ञान मिळता अखंड
त्याचे सामर्थ्य ही कळे||३||
माझी कला माझी माय
असे प्रेमाचा सागर
तिचा प्रसार करण्या
करू आरंभ जागर||४||
करा सन्मान कलेचा
मिळे कौतुकाची थाप
जपा आवड मनाची
सोबतीस मायबाप||५||