Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shobha Wagle

Abstract Fantasy Inspirational

3  

Shobha Wagle

Abstract Fantasy Inspirational

स्वप्न शास्त्र

स्वप्न शास्त्र

1 min
174


माणूस झोपेच्या स्वाधीन झाला की

बहुतेक वेळा असतो स्वप्नांच्या दुनियेत 

ही स्वप्ने ही असतात वेगळ्या प्रकारची

स्वप्नातल्या गोष्टी बोलत असतो झोपेत.

 

लहान मुलांना गोड परीची स्वप्ने पडतात

सर्वांनाच पाहिलेली स्वप्ने आठवत नसतात

तर कुणाला जशीच्या तशी ती आठवतात

अन सकाळी उठल्यावर ते सांगत असतात.


काहीना सुचक स्वप्ने पडतात बरी वाईट

विश्वास दुसरा कुणी ठेवत नसतो यावर

पण बघणाराच जाणत असतो खरेपण

प्रत्यक्ष जर आला अनुभव त्या स्वप्नावर.


स्वप्नावरून भविष्य सांगितले जात असते

भोळा भाबडा विश्वास ठेवतो असतो त्यावर

स्वप्नात पाहिलेली स्वप्न कृती करतो प्रत्यक्ष

कधी गवसते तर कधी फसगत होते स्वप्नावर.


झोपेतल्या स्वप्नावर विश्वास कितपत ठेवावा

दिवसा ढवळ्या चांगली स्वप्ने पहावी माणसाने

आपल्या स्वप्न पुर्तीसाठी झटावे पूर्ण होई पर्यंत

दिवसा पाहिलेली स्वप्ने पूर्ण करावी ध्येयाने.


Rate this content
Log in