स्वैर नृत्य
स्वैर नृत्य
लटपट लटपट मधुर चालणं
तुझं मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेच
नारी गं ... हं नारी गं...
आठवलं हे गाणं
झाली नृत्याची जाणं
म्हंटले इथे नाही काही वाणं
मुक्त आविष्कार हर्षाचा हे प्रमाण ..
अनॉनयमाऊस चित्रकार महान
त्याची भागेना तहान
म्हणुनी केला प्रयत्न थोडा सान
राखण्या स्वैर नृत्याचा मान...
ताल लय तोल सारे सारे
रेखीले सुरेख न करता अनमान
झाला स्वतःतच बेभान
राखुनी कलेशी ईमान...!