Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Inspirational Thriller

3  

Pandit Warade

Inspirational Thriller

स्वातंत्र्याचा पोवाडा

स्वातंत्र्याचा पोवाडा

1 min
178


आधी नमन भारतमातेला sssss

आधी नमन भारतमातेला,

क्रांती वीरांना, शूर शाहिदांना,

स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान 

रंगले इतिहासाचे पान जी रं जी जी ।।धृ।।


शृंखला जुलमी सत्तेची 

इंग्रजांची, गोऱ्या साहेबांची,

धुळीला भारतीयांची शान

हरवला त्यांचा स्वाभिमान जी रं जी जी ।।१।।


तरुणांचे रक्त सळसळले sssss

पित्त खवळले, क्रोधे उसळले

स्वातंत्र्याची घेतली आण

जुल्मी सत्तेची केली धूळधाण जी रं जी जी ।।२।।


मुक्त करण्या मातृभूमीला sssss

विडा उचलला, लावून पणाला

वीरांनी अपुले स्वतःचे प्राण

मिळवला स्वातंत्र्याचा मान जी रं जी जी ।।३।।


बायको, मुले, घर सोडले sssss

शत्रूशी भिडले, त्वेषाने लढले

दशदिशांनी उठविले रान

गोऱ्या साहेबांना केले हैराण जी रं जी जी ।।४।।


पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली

गोऱ्यांच्या जुलमातून भारतभूमी मुक्त झाली 

भारतीयांना स्वातंत्र्याची शुभ सकाळ दिसली

जना मनातून प्रसन्नतेची महालाट उसळली

डौलाने फडकला तिरंगा लाल किल्ल्यावरती

करोडो हृदयी देशभक्तीची आली असे भरती

स्वातंत्र्याचा अमृत उत्सव करू साजरा आज 

घरोघरी फडकवू तिरंगा, राष्ट्राचा सरताज

तिरंगा भारतीयांची शान sssss

जीव की प्राण, करू सन्मान

बाळगू हृदयामध्ये अभिमान

स्मरूया सीमे वरचे जवान जी रं जी जी ।।५।।


Rate this content
Log in