सुगंधी स्नेहबंध
सुगंधी स्नेहबंध


औदार्य पुष्पांचे महान
स्वच्छंदी पाखरांवरती
मनःपूर्वक सेवाभावी
प्राशन करण्या रसावरती
फुले मनमोहक सुगंधी
त्यावरी नाजूक फुलपाखरे
स्नेहबंध परिमळ निस्वार्थी
नाते अनमोल हेचि खरे
भेदभाव ना मनात जराही
हरेक पुष्पांच्या क्वचितही
सारे रानपाखरे एकसमान
आदर्श घे मानवा जरा काही