Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Bokare

Abstract Others

4  

Suhas Bokare

Abstract Others

सृजनाचे शिंतोडे

सृजनाचे शिंतोडे

1 min
265


आज तूला काय सांगू, वादळाचा बेत आहे.

टोळधाडीची हवा, शेताकडे ते नेत आहे.


फालतू ची पेरणी काढू नका हो वावरातं.

आजकाली जे नको ते वावरातं येत आहे.


सालई चे रान आहे सृजनाचे नं भुकेले.

शिंपलेले थेंब फक्ते अंतरे फेकेत आहे.


शांत वाटे शेवटाला, मी कसे येऊ किनारी.

जीवनाची वाट आता, ताण सारे देत आहे.


सालई चे रान सारे, सेक ओढू नेत आहे.

ओढ त्याची पाहतांना, आंनदे मी घेत आहे.


राहिलेल्या अंतराला, चालवेना शेवटाला.

अंतराला नाव ठेवू , हानिकारी शेत आहे.


रंग माझा वेगळा, आतून हे संकेत आहे.

हौद सारे नाचते हो, रंग ते गर्तेत आहे.


Rate this content
Log in