सरीचा थेंब
सरीचा थेंब
1 min
11.3K
सरीचा थेंब हा गाली
दिसे ओठांवर लाली
तुझी पागोळ होताना
मला चुम्बुन जातो रे !
सरीचा तो गार स्पर्श
ओठांना बिलगून जातो
लडिवाळ त्याची भाषा
मला गुंतवूनी जाते रे !
सरीचे कुरवाळणे भासे मज
जणुं आईचा स्पर्श मायेचा
ममतेची हाक ती असे
मला गोंजारून जाते रे !
बालपणी चा आठव तो
येई गहिवरुन गालावर
सरीत मिसळून जाय तो
हुंकार काळजाचा होता रे !
सुखदुःखा च्या सरी ह्या
दो नयनी ओसंडून वाही
सरीचा थेंब हा गाली
ओठाच्या पागोळीतून धावी रे !